माझ्यातील मी 😔
*मला वाटायचे की नोकरी *करणाऱ्या स्त्रिया खूपच सुखी असतात ,आनंदी असतात ,पण* *खरं पहायला गेले तर तसे नसते.*आपल्याला दिसते ते चित्र खूपच वेगळे असते आणि वास्तविकता खूपच वेगळी असते . तिचे वास्तव हे तिने जगापासून लपवून ठेवलेले असते . नावाला असलेली नोकरी हे फक्त देखाव्यापूर्ती . तिथे होणारी मानसिक कुचंबणा ,,,,वरिष्ठांकडून होणारा त्रास,,,, आणि आपली बाजू कोणी ऐकून घेत नाही याची मनाला लागलेली रुखरुख... त्यातच स्वाभिमानी असलेल्या स्त्रियांसाठी या सर्व गोष्टी तिच्या काळजाचे तुकडे तुकडे करत असतात. हा प्रसंग मात्र नेहमीच ठरलेला असतो. यात कधी चढ कधी उतार मात्र आपल्याला पाहायला मिळेल😊 सहकारी जेव्हा पुरुष असतो तेव्हा तो मात्र वरिष्ठाला भेटून आपली बाजू मांडू शकतो . वेळोवेळी त्याला जे हवे ते स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसलाही धक्का न लागू देता त्या स्त्रियांबद्दल काहीही बोलतो आणि स्वतःला जसा अर्थ घ्यायचा अशा पद्धतीने घेऊन तो तिला मात्र चुकीचे ठरवण्यात मागेपुढे कसलीही कसर सोडत नाही. असेच मला अवतीभोवती जाणवते . अशा प्रकारचे वातावरण प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. त्या...