होय खरचं आहे हे ...🤔 पण नेमकं काय
*स्वयंपाकघरातूनच तुमच्या शरीरात शिरतंय विष, आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर..... मग चौथी गोष्ट आहे तरी काय...* प्लॅस्टिक मुळे महासागरात होणारे दुष्परिणाम हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्लास्टिक हे आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्यापासून ते प्लास्टिक कंटेनरमधून आलेले पार्सल खाण्यापर्यंत सर्वच गोष्टीत आपण प्लास्टिकचा वापर करत असतो. मात्र आता हेच प्लास्टिक मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात आपल्या अन्नातून, पाण्यातून आणि अगदी श्वासावाटेही शरीरात प्रवेश करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आपले स्वयंपाकघर हे या सूक्ष्म प्लास्टिक कणांचे सर्वात मोठे स्त्रोत ठरताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, मायक्रोप्लास्टिक पूर्णपणे टाळणे हे कठीण आहे. मात्र आपण काही दैनंदिन सवयीत बदल करुन त्याचा धोका नक्कीच कमी करू शकतो. प्लास्टिकच्या भांड्यांना उष्णता लागल्यास किंवा प्लास्टिक बोर्डवर अन्न काप...