आयुष्याच्या धावपळीत हरवलेलं सुख... होय माझं हे राहूनच गेलं....

 ✍🏻✍🏻✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

लेखन प्रपंच का .... तर माझं काही राहून गेलय का ?

*जगायचं राहून गेलं नाही पाहिजे... होय योग्य च वाचत आहात तुम्ही आपलं जगायचं राहून जातय आणि याला कारणीभूत म्हणजे आपण स्वतःच बरका मित्रांनो.*

दैनंदिन जीवनात आपण खरचं जगतोय का 😔 क्षणभंगूर जीवनामध्ये ह्या आपण किती दिवसांचे पाहुणे आहोत आणि आपली कधी विकेट आपली जाईल याची काहीचं खबर नाही कोणालाचं.🤔

आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात,बऱ्याचं वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात.

जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीच पर्मनंट नाही मित्रानो...*

आज आहे तर उद्या नाही.शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीचं राहतात. खर पाहायचं म्हटलं तर कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है यानुसार पैसा नौकरी कुटूंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता उभं आयुष्य मात्र तसचं राहतं आणि सर्व सुखे मिळतात पण स्वच्छंदी .जगायचे मात्र तसेच राहते.......


I am Happy feeling....


म्हणून माणूस म्हणून जगताना प्रत्येक व्यक्ती ने जगून घ्यावं,बोलून घ्यावं मनमुराद हासून घ्यावं,आलंच रडायला तर रडूनही घ्यावं....

   रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलुन सुरुवात करून पहावे..

प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे आपल्याला

वय,नोकरी,व्यवसाय,प्रतिष्ठा, जात पात,धर्म यापलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे. 

       *नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्यावं*

लहानपणी वाटतं मोठं व्हावं,

मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं हा पाठशिवणीचा खेळ काही संपत नाही ... ....

या सगळ्या चक्रव्युहात जगायचं मात्र राहून जातं.ज्याला जे आवडतं त्यासाठी स्वतः वेळ काढावा . स्वतःचे छंद जोपासाव ... कधी पुस्तकं वाचावित तर कधी मित्रासोबत दिलखुलास गप्पा माराव्यात . .

खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावर ही आपला अभ्यास हवा. त्यामुळे निट परिस्थितीचा अभ्यास करावा तेवढा कमी च आहे .

आज मनमारून जगालही,पण तुमच्या मनाचं काय?पैसे नक्कीचं कमवा पण स्वत:साठी ही थोडं जगा मित्रानो....

खूप काही कमवाल ही पण स्वतःचे छंद,*

*स्वतःची आवड,* कधी कुंटूबा सोबत जेवणाचा आस्वाद घेणे हे सुद्धा  खूपच आत्मिक समाधान देवून जातो . ......


*स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावून ही आपण कफल्लक आहोत.*

म्हणून मित्रांनो जगायचं राहून नाही गेलं पाहिजे असं जगा.*

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझे आरोग्य माझ्या हाती

नमस्कार करतो.... अरे नको नको

होय खरचं आहे हे ...🤔 पण नेमकं काय