होय खरचं आहे हे ...🤔 पण नेमकं काय

*स्वयंपाकघरातूनच तुमच्या शरीरात शिरतंय विष, आजच बदला या गोष्टी, चौथ्या गोष्टीचा तर दर तासाला होतो वापर..... मग चौथी गोष्ट आहे तरी काय...*

          प्लॅस्टिक मुळे महासागरात  होणारे दुष्परिणाम


हल्लीच्या धावपळीच्या जीवनात प्लास्टिक हे आपल्या सर्वांच्या

 आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी प्लास्टिकच्या

 बॉटलमधून पाणी पिण्यापासून ते प्लास्टिक कंटेनरमधून

 आलेले पार्सल खाण्यापर्यंत सर्वच गोष्टीत आपण प्लास्टिकचा

 वापर करत असतो. मात्र आता हेच प्लास्टिक

 मायक्रोप्लास्टिकच्या स्वरूपात आपल्या अन्नातून, पाण्यातून

 आणि अगदी श्वासावाटेही शरीरात प्रवेश करत असल्याचे

 धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे

 आपले स्वयंपाकघर हे या सूक्ष्म प्लास्टिक कणांचे सर्वात मोठे

 स्त्रोत ठरताना दिसत आहे.


तज्ज्ञांच्या मते, मायक्रोप्लास्टिक पूर्णपणे टाळणे हे कठीण

 आहे. मात्र आपण काही दैनंदिन सवयीत बदल करुन त्याचा

 धोका नक्कीच कमी करू शकतो. प्लास्टिकच्या भांड्यांना

 उष्णता लागल्यास किंवा प्लास्टिक बोर्डवर अन्न कापताना

 अतिसूक्ष्म प्लास्टिकचे कण अन्नात मिसळतात. हे कण शरीरात

 साठल्याने दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

 

यावर मात करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत चला तर मग आपण पाहू............

१ . प्लास्टिक भांड्यांना बंदी ..........

अन्न साठवण्यासाठी किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी प्लास्टिक ऐवजी काचेच्या (Glass) किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा.


2 . लोखंडी आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर .............

नॉन-स्टिक पॅनवरील कोटिंग खराब झाल्यावर त्यातून प्लास्टिकचे कण अन्नात जातात. त्यामुळे स्वयंपाकासाठी लोखंडी तवा (Cast Iron) किंवा स्टीलच्या कढईला प्राधान्य द्या.


3  चॉपिंग बोर्डमध्ये बदल..... 

प्लास्टिक चॉपिंग बोर्डऐवजी लाकडी किंवा बांबूच्या बोर्डचा वापर करणे अधिक सुरक्षित आहे, कारण प्लास्टिक बोर्डवर सुरीने कापताना त्याचे सूक्ष्म कण अन्नात मिसळतात.

४ . पाण्याच्या बाटल्या बाबत खबरदारी.........

प्लास्टिक बाटल्यांमधील पाण्यात सूक्ष्म कणांचे प्रमाण अधिक असते. प्रवासात किंवा घरी स्टील, तांबे किंवा काचेच्या बाटल्यांचा वापर करणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल.


०५ .  टी-बॅग्ज टाळा...

आजकल मिळणाऱ्या अनेक टी-बॅग्जमध्ये प्लास्टिकचे तंतू असतात. गरम पाण्यात या बॅग्ज टाकल्यास अब्जावधी सूक्ष्म कण चहात उतरतात. त्याऐवजी साधी चहापत्ती वापरणे सर्वोत्तम ठरते.


शरीर नैसर्गिक रित्या डिटॉक्स करण्याचे उपाय ... ... ......

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी

 तुम्ही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करावा. तुमच्या आहारात

 फायबरयुक्त पदार्थ, फळे आणि पालेभाज्यांचा समावेश

 वाढवावा, ज्यामुळे पचनसंस्था स्वच्छ राहते. तसेच नियमित

 व्यायाम आणि घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर

 टाकण्यास मदत होते. पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी

 आरओ (RO) फिल्टर वापरावेत, जे मायक्रोप्लास्टिक

 रोखण्यासाठी प्रभावी ठरतात. वेळोवेळी केलेले हे छोटे बदल

 आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भविष्यातील मोठ्या

 आरोग्य समस्यांपासून वाचवू शकतात.

🌍 Plastic एक हानिकारक पदार्थ - पर्यावरण आणि आरोग्यासाठी धोका कळतय ना आपणास सर्व.............

आजच्या काळात plastic चा वापर खूप वाढला आहे. घरात, बाजारात, शाळेत – सर्वत्र plastic दिसते. पण हा plastic आपल्या पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे. तो सहज नष्ट होत नाही आणि वर्षानुवर्षे पृथ्वीवर साचत राहतो.


✍️ plastic म्हणजे काय . .... ..... .....  ?

Plastic हा एक कृत्रिम पदार्थ आहे जो रसायनांपासून तयार

 केला जातो. तो हलका, स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे

 त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि तो विघटनशिल पदार्थ आहे . त्यास नष्ट करण्यास हजारो वर्षे लागतात तसेच तो माती पाणी आणि पर्यावरणासही मोठ्या प्रमाणात हानि पोचवतो . प्राणी जिवांनाही मोठ्या प्रमाणात याचा दुष्परिणाम भोगावा लागतो .. तर असे हे प्लॅस्टिक आहे . 

✍️ Plastic चे पर्यावरणावर होणारे परिणाम ............. 

Plastic मातीमध्ये मिसळल्या  जमिनीची गुणवत्ता कमी होते.

नद्या आणि समुद्र प्रदूषित होतात.

मासे आणि इतर प्राणी plastic खाऊन मरतात.

Plastic जाळल्यास विषारी धूर तयार होतो .

✍️ Plastic चे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम............

Plastic मधील रसायने अन्नात मिसळू शकतात

---------------------------------------------------------------

यामुळे कॅन्सर आणि हार्मोनल समस्या होण्याचा धोका वाढतो

-----------------------------------------------------------------

गरम पदार्थ plastic मध्ये ठेवल्यास अधिक नुकसान होते

---------------------------------------------------------------

✍️Plastic वापर कमी करण्याचे उपाय

---------------------------------------------------------------

०१)कापडी पिशव्या वापरा....

०२)स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरा....

०३)Single-use plastic टाळा....

०४) वस्तूंचा वापर करा....

चला तर शेवटी निष्कर्ष पाहूया ...........

Plastic आपल्या सोयीसाठी आहे, पण त्याचा अति वापर

पृथ्वीला आणि आपल्या आरोग्याला नुकसान पोहोचवतो.

 त्यामुळे आपण सर्वांनी plastic चा वापर कमी करून

 पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


होय पटतय ना सर्वांना😊 पटलेच पाहिजे कारण पुढील उज्वल भविष्य आपल्याच हातात आहे त्यामुळे याचा विसर पडता कामा नये👏

लेखन प्रपंच ... 


✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

टिप्पण्या