माझ्यातील मी 😔
*मला वाटायचे की नोकरी *करणाऱ्या स्त्रिया खूपच सुखी असतात ,आनंदी असतात ,पण*
*खरं पहायला गेले तर तसे नसते.*आपल्याला दिसते ते चित्र खूपच वेगळे असते आणि वास्तविकता खूपच वेगळी असते . तिचे वास्तव हे तिने जगापासून लपवून ठेवलेले असते . नावाला असलेली नोकरी हे फक्त देखाव्यापूर्ती .
तिथे होणारी मानसिक कुचंबणा ,,,,वरिष्ठांकडून होणारा त्रास,,,, आणि आपली बाजू कोणी ऐकून घेत नाही याची मनाला लागलेली रुखरुख... त्यातच स्वाभिमानी असलेल्या स्त्रियांसाठी या सर्व गोष्टी तिच्या काळजाचे तुकडे तुकडे करत असतात. हा प्रसंग मात्र नेहमीच ठरलेला असतो. यात कधी चढ कधी उतार मात्र आपल्याला पाहायला मिळेल😊
सहकारी जेव्हा पुरुष असतो तेव्हा तो मात्र वरिष्ठाला भेटून आपली बाजू मांडू शकतो . वेळोवेळी त्याला जे हवे ते स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसलाही धक्का न लागू देता त्या स्त्रियांबद्दल काहीही बोलतो आणि स्वतःला जसा अर्थ घ्यायचा अशा पद्धतीने घेऊन तो तिला मात्र चुकीचे ठरवण्यात मागेपुढे कसलीही कसर सोडत नाही. असेच मला अवतीभोवती जाणवते . अशा प्रकारचे वातावरण प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. त्यात सरकारी नोकरी असेल ..खाजगी असेल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल पुरुष हा स्त्रीला त्रास देण्यासाठी कुठेच मागे पडणार नाही असेच मला वाटते . पण कधी कधी हे चुकिचे ही असू शकते . प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगवेगळा असू शकतो . खाजगी क्षेत्रातील उदाहरण पाहायचे झाले तर तेथील नोकरी स्त्री स्वइच्छेने सोडू शकते .
तिला जशी पाहिजे तशी ती मिळवू शकते ,पण सरकारी कर्मचारी असलेली स्त्री मात्र तिला दुसरा पर्याय उरत नसतो त्यामुळे ती निमुटपणे सर्व काही सहन करते आणि तिच्या स्वाभिमानाला किती वेळा खाली मान घालून अपमानाचे हुंदके गिळावे लागतात हे तिचं तिलाच माहिती..
खरं पहायला गेलं तर तिचीही त्यात काही चूक नसते. स्त्री असणे हाच मोठा गुन्हा असतो कि काय असेच नेहमी वाटत असते मनाला .एक वेगळी असमानता ... जिवातील चालू असलेली रुखरुख... जणू काय पाण्यातून काढलेल्या माशासारखी होत असते तिच्या मनाची अवस्था. मनाची चंचलता.. अस्थिर स्वभाव हे सर्व काही तिच्या आयुष्यातील एक भागच बनून जातो आणि तिलाही सवय लागते ह्या सर्व एक ना अनेक गोष्टी सोबत घेवून जीवन जगण्याची*...
*खरं म्हणजे हे जीवन नव्हे असे ही तिच्या मनाला वाटते. कधीतरी फुलपाखरासारखं तिनेही स्वच्छंदी जीवन जगावं.... तिच्या मनाला वाटेल तिथे तिने व्यक्त व्हावं ...आपलं मन मोकळं करावं... कधी तिला काही आवडलं तर ते बनवून खावं...काही आवडलं तर तिने ते पटकन स्वतःसाठी खरेदी करून घ्यावी आणि आयुष्याचा मनमुराद आनंद घ्यावा ...असे वाटत असतानाही दुसरीकडे ती .. यात वेळ जातो, पैसा जातो कुटुंबाप्रती असलेली तिची तळमळ दिसते. या रहाटगाडग्या चकरात तिच्या स्वतःसाठी च्या सार्या गोष्टी मागे पडत जातात आणि शेवटी उरते ती फक्त तीचं स्त्रीत्व..** जे की काळानुसार घडलेलं असतं ** कुठेतरी खोलवर मनामध्ये तिचं स्त्रीत्व लपलेला असतं हे मात्र खर बरं का *.*त्याला ती काही हळुवार फुंकर घालून वरती काढू शकत नाही पण ती एकांतात बसल्यानंतर तिला काही गोष्टी सहज आठवतात आणि कधीतरी एक दोन क्षण तिच्या आयुष्यातील सुखाचे अनुभवायला मिळतात यापेक्षा अजून वेगळं जीवन काय जगणार ती . खरं पाहायचं म्हणलं तर तिच्यासोबत असलेला तिचा पती** तिची मुलं* **यांनी खरंतर घरामध्ये असलेल्या स्त्रीचा मग ती पत्नी असेल,, आई असेल ,,बहीण असेल किंवा एक स्त्रि म्हणून कोणी का असेना... तिचं मन जाणायला पाहिजे , तिला ओळखायला पाहिजे,तिचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण वाट मोकळी करून दिली पाहिजे ..याची जाणीव मात्र प्रत्येक पुरुषाने ठेवली तर स्वातंत्र्य मिळवूनही पारतंत्र्यात असलेली स्त्री मात्र कुठेतरी मोकळा श्वास घेईल यात शंका नाही.. पण तिला गरज आहे ते थोड्याफार आधाराची ..आपल्या माणसांच्या साथीची आणि समाजामध्ये वावरत असताना तिच्या स्वाभिमान जिवंत राहावा यासाठी मात्र समाजाने एक स्त्रि म्हणून असलेला तिचा आदर, तिचा सन्मान कायम करावा... जेणेकरून आजही ती उजळ माथ्याने प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये , प्रत्येक कर्मभूमीमध्ये अतिशय वाखणण्यासारखे कार्य करायला ती सरसावून पुढे जाईल आणि या सर्व तिच्या प्रेरणेचे बळ सर्व तिच्या आसपासचे लोकं ठरतीलच... यामध्ये किती मोठे समाधानाचे हे शब्द असतील जे कि ती अभिमानाने सांगेल की एका पुरुषाच्या मागे जशी स्त्री उभा असते तसेच तिच्या मागे कोणीतरी एक खंबीर पुरुष उभा आहे यापेक्षा तो मोलाचा क्षण कोणता असेल बरे पुरुषासाठी...
🤗 मग तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून मला नक्की सांगा स्वतःचे अनुभव*✨✨
शेवटी अनुभव महत्वाचे होय ना . .....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
👉 “तुमचा अनुभव किंवा प्रश्न खाली comment करा, मी नक्की reply देईन 👍”